Posts

Showing posts from December, 2017

हे बोलणे बरे नव्हे.....!!!!

आम्ही राज्यघटना बदलण्यासाठी सत्तेत आलो आहोत अस वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्र सरकार मधील एका मंत्र्याच्या हे लक्षात आले नाही का.....???? की राज्यघटनेत बदल करणे इतके सोपे आहे का....???  प्रामुख्याने देशातील सर्व राज्यकारभार हा भारताच्या संविधानानुसार चालतो,  देशात कायदे प्रक्रिया ही सर्वांना सारखीच लागू आहे आणि आता तर  भारताच्या पंतप्रधानांनी राज्यघटना हाच देशाचा सर्वोच्च धर्मग्रंथ असून, २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याची सुरूवात केली. हे त्या वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या मंत्री महोदयांना कधी समजणार....??????